महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results) झाल्यानंतर सगळ्यांनाच सेलिब्रेशन चालू होत पण ते फक्त काही वेळेसाठीच . मी असे का म्हणतो आहे कारण बारावीचा निकाल तर लागला. पण ,आता पुढे काय ?
जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना मात्र, करिअरच्या दृष्टीने खूप खूप प्रश्न असतात. खरंतर, ही चिंता ज्यांनी मेरिट मध्ये आले आहे त्यांनाही आहे आणि जे उत्तम मार्क ने उत्तीर्ण झाले आहेत त्यांनाही आहे.
याचसाठी बारावीनंतर पुढे कोणता करिअर पर्याय निवडावा यासाठी आम्ही तुम्हाला वाणिज्य शाखेतील (Commerce) काही पर्याय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता.
वाणिज्य शाखेतून इयत्ता 12 वीचे शिक्षण घेणाऱ्या किंवा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे उत्तम करिअर करण्यासाठी अनेक पर्याय आहेत.पण कोर्स निवडणे कधीही सोयीस्कर पर्याय असू शकत नाही तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचा ,प्रेरणादायी कोर्स निवडावा.
12th Commerce नंतर योग्य कोर्स कसा निवडावा ?
- 12 वी कॉमर्स नंतर योग्य कोर्स निवडताना तुम्हाला उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती असणे आवश्यक आहे.
- उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांबद्दल जाणून घेतल्याने , त्या कोर्स अभ्यासक्रम माहिती असल्याने तुम्हाला तुमचे आवडीचे क्षेत्र निवडणे अगदी सोपे होऊन जाते
- आवश्यक असलेले स्किल्स मिळवण्यावर जर आपण काम केले तर तुम्हाला तुमचा Dream Job मिळण्यास मदत होईल. कोर्स निवडताना खालील मुद्दे तपासून बघा ,
- संबंधित कोर्स मध्ये तुमचा इंटरेस्ट ओळखा.
- अभ्यासक्रम आणि विषय तपासा.
- कोर्स साठी लागणारी पात्रता,अभ्यासक्रमाचा कालावधी,फी तपासा .
Best courses after 12th commerce
12th Commerce नंतरच्या टॉप 20 सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रमांची यादी खालीलप्रमाणे,
- Bachelor of Commerce (B. Com)
- Bachelor of Economics (BE)
- Bachelor of Accounting and Finance (BAF)
- Bachelor of Commerce in Banking and Insurance (BBI)
- Bachelor of Commerce in Financial Market (BFM)
- Bachelor of Business Administration (BBA)
- Bachelor of Business Administration – International Business (BBA-IB)
- Bachelor of Business Administration – Computer Application (BBA-CA)
- Industry Oriented Integrated Courses
- Chartered Accountancy
- Company Secretary (CS)
- Cost and Management Accountant
- Journalism and Mass Communication
- B. Com (General)
- B. Com Marketing
- B. Com Tourism & Travel Management
- BA in Humanities & Social Sciences
- BA LLB
- B. Des in Design
- Diploma in Education (DEd)
12th Commerce नंतर पदवी चे कोर्स / Bachelors course after 12th commerce
Bachelor of Commerce (B. Com)
- बॅचलर ऑफ कॉमर्स हा 3-वर्षाचा Under Graduate प्रोग्राम आहे जो कि विद्यार्थ्यांना वाणिज्य (commerce),अर्थशास्त्र (Economics),व्यवसाय कायदा (Business Law),लेखा (Accountancy),कर आकारणी ( Taxation)या विषयांमध्ये तज्ञ बनवते .
- बॅचलर ऑफ कॉमर्स मध्ये मुख्यतःसामान्य व्यवसाय आणि अर्थकारण याचे धडे दिले जातात. हा कोर्स मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध आहे .
- पात्रता : वेगवेगळ्या कॉलेज वा विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी मेरीट लावले जाते , बीकॉम अभ्यासक्रमासाठी पात्रता 12वी HSC किंवा त्यासारख्या परीक्षेत कमीत कमी 50% गुण मिळवून उतीर्ण असावे.
बीकॉम कोर्स हा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात लोकप्रिय आणि मागणी असलेला कोर्स आहे.बीकॉम चा सिलाबस हा कर आकारणी (Taxation), अर्थशास्त्र (Economics), लेखा (Accountancy) इत्यादी विषयांला महत्व आहे .
b. com ke baad kya kare
|
B. Com नंतर नोकरीचे पर्याय |
पात्रता |
संबधित महत्वाच्या कंपनी |
सरासरी पगार |
|
Financial Risk |
B. Com/ B. Com (Hons) विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते |
Deutsche Bank, |
रू.10 लाख प्रती वर्ष to रू.18 लाख प्रती वर्ष |
|
Business Analyst |
B. Com/ B. Com (ऑनर्स) विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते |
EY, KPMG, Deloitte, |
रू.3.5 लाख प्रती वर्ष to रू. 5.5 लाख प्रती वर्ष |
|
Digital Marketer |
कोणत्याही शाखेतली पदवी |
Deloitte, Accenture, |
रू. 4.5 लाख प्रती वर्ष to रू.10 लाख प्रती वर्ष |
|
Accountant |
B. Com शाखेतली पदवी |
Banks, Corporate |
INR 3.5 लाख प्रती वर्ष – INR 18 लाख प्रती वर्ष |
Bachelor of Economics (BE)
- बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स हा ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे जो वस्तू आणि सेवांचे उत्पादन, डीष्ट्रीबुशन याचे अनालिसिस करतो. जे विद्यार्थी बँकिंग आणि फायनान्स आणि इतर मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांमध्ये मोठे बनू इच्छितात ते अर्थशास्त्राची पदवी घेऊ शकतात.
- पात्रता: विद्यार्थ्यांनी 12th Commerce बोर्ड परीक्षा किमान 50% एकूण गुणांसह किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून समतुल्य CGPA उत्तीर्ण केली पाहिजे.
- नोकरीचे पर्याय : Economic Researcher ,Sales Analyst ,Economist ,Securities Analyst ,Trainee Investment Analyst ,Fixed Income Portfolio Manager , Investment Administrator , Financial Service Manager , Customer Profit Analyst
सरासरी पगार: ६ ते ८.५ लाख प्रति वर्ष
Bachelor of Accounting and Finance (BAF)
- बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स (BAF) हा तीन वर्षांचा ग्रेजुएट कोर्स आहे जो आर्थिक विश्लेषण (Finance) आणि लेखा मानकांच्या (accounting)अनेक प्रक्रियांशी संबंधित कौशल्ये शिकण्यासाठी इच्छुकांनी ह्या कोर्स ला प्रवेश घावा.
- पात्रता: ज्या उमेदवारांनी किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा पूर्ण केली आहे.
- सरासरी पगार: ३ ते 10 लाख प्रति वर्ष
- संबधित महत्वाच्या कंपनी : EY, KPMG, Deloitte, PWC, Deloitte, Accenture, Oracle, Gartner, SBI, NABARD, PNB, CBI, etc.
Bachelor of Commerce in Banking and Insurance (BBI)
- बी.कॉम. बँकिंग आणि विमा हा 3 वर्षांचा पूर्ण-वेळ पदवी अभ्यासक्रम आहे जो बँकिंग आणि विमा यांच्याशी संबंधित विषयांचा बनलेला आहे.
- पात्रता: मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून 10+2 शिक्षण किमान 50% सह पूर्ण असावे .
- परीक्षा प्रकार : सेमिस्टर सिस्टम
- नोकरीचे क्षेत्र :Banks, investments, the insurance industry, savings and loan associations, and such.
- नोकरी प्रोफाइल :Accountant, Financial Advisor, Marketing Agent, and Sales Representative
- महत्वाच्या कंपनी : TCS, HCL, DELL, CTS, CITY Bank, Infosys etc.
- सरासरी पगार : २ ते २० लाख प्रति वर्ष
Bachelor of Commerce in Financial Market (BFM)
- बी.कॉम. इन फायनान्शिअल मार्केट्स हा फायनान्शिअल मार्केट्समधील ३ वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. आर्थिक बाजारपेठेमध्ये लोकांना बाजारात रोखे, स्टॉक आणि कमोडिटीज यांसारख्या प्रकारांमध्ये व्यवसाय, व्यापार करण्याचे ज्ञान मिळते.
- या कोर्समध्ये कर्ज आणि इक्विटी मार्केट, परकीय चलन बाजार आणि वित्तीय बाजार हे विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत.
- पात्रता: मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून वाणिज्य शाखेतील 10+2 किंवा समकक्ष शाखेतील अभ्यास किमान 50% च्या एकूण गुणांसह पूर्ण केलेली असावी.
- परीक्षा प्रकार : सेमिस्टर सिस्टम
- नोकरीचे क्षेत्र : Public Accounting Firms, Policy Planning, Foreign Trade, Banks, Budget Planning, Inventory Control, Merchant Banking, Marketing
- नोकरी प्रोफाइल : Finance Controller, Treasurer, Finance Officer, Credit and Cash Manager, Risk Manager, Financial Research Manager, Financial Planning Manager, Trainee Associate, Financial Planning Consultant
B. Com Tourism & Travel Management
- बॅचलर ऑफ कॉमर्स इन टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट हा 3 वर्षांचा पूर्ण-वेळ पदवी अभ्यासक्रम आहे जो प्रवास आणि पर्यटन व्यवसायाच्या संबंधित आर्थिक आणि आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतो.
- कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन मार्केटिंग (tourism marketing), हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस कम्युनिकेशन, इकॉनॉमिक्स, फायनान्शियल मॅनेजमेंट, रेव्हेन्यू मॅनेजमेंट, इको-टुरिझम आणि बरेच काही यासारख्या विषयांवर हा कोर्स केंद्रित आहे.
Mass Communications and Journalism / जनसंवाद आणि पत्रकारिता
- मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम हा वर उल्लेख केलेल्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा करिअर मार्ग आहे.
- 12वी कॉमर्स नंतरचे बहुतेक करिअरचे मार्ग हे फायनान्स आणि बिझनेस फील्डच्या धर्तीवर आहेत.
- हा कोर्स अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे स्वतःला मीडिया हाऊस आणि क्रिएशन संबंधित क्षेत्रात काम करू इच्छितात.
- हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे जो तुमचे स्किल्स विकसित करतो आणि तुम्हाला मीडिया, जनसंपर्क, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि इतर यासारख्या क्षेत्रात करिअर पर्याय शोधण्यात मदत करतो.
FAQ :
1. Which job has the highest salary in commerce?
१२वी कॉमर्सनंतर सर्वाधिक पगार मिळवून देणारा कोर्स हा विद्यार्थ्याच्या आवडी, कौशल्य आणि मेहनतीवर अवलंबून असतो. फक्त कोर्स निवडण्यापेक्षा त्या क्षेत्रातील कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे आहे. काही चांगले करिअर पर्याय:
1. Chartered Accountancy (CA)
CA हा कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठेचा पर्याय आहे. अकाउंटिंग, टॅक्सेशन आणि फायनान्स क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
ICAI च्या वेबसाइट ला भेट द्या.
2. Company Secretary (CS)
कंपनीचे कायदे, कॉर्पोरेट नियम आणि कम्प्लायन्स क्षेत्रात करिअर करण्यासाठी CS हा उत्तम पर्याय आहे.
3. CMA (Cost and Management Accountant)
फायनान्स मॅनेजमेंट, कॉस्ट कंट्रोल आणि बिझनेस प्लॅनिंगमध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CMA उपयुक्त आहे.
4. B.Com + Professional Certification
B.Com सोबत:
- Financial Modeling
- Digital Marketing
- Data Analytics
- GST & Taxation
- Banking Certification
यासारखी कौशल्ये शिकल्यास नोकरीच्या संधी वाढू शकतात.
5. BBA + MBA
Management आणि Business क्षेत्रात जायचे असल्यास BBA नंतर MBA हा चांगला मार्ग आहे.
लक्षात ठेवा: जास्त पगारासाठी फक्त पदवी पुरेशी नसते; कौशल्य, अनुभव आणि सतत शिकण्याची तयारी महत्त्वाची असते.
2. Which is better, BBA or B.Com?
B.Com आणि BBA हे दोन्ही चांगले पर्याय आहेत, पण तुमच्या करिअरच्या उद्दिष्टानुसार निवड करावी.
| मुद्दा | B.Com | BBA |
|---|---|---|
| मुख्य क्षेत्र | Accounting, Finance, Tax | Management, Business |
| कालावधी | 3 वर्षे | 3 वर्षे |
| योग्य कोणासाठी? | अकाउंट्स आणि फायनान्समध्ये रस असणारे | Management आणि Business मध्ये रस असणारे |
| पुढील शिक्षण | CA, CMA, M.Com, MBA | MBA, Entrepreneurship |
| नोकरी क्षेत्र | Banking, Finance, Accounting | Marketing, HR, Management |
B.Com निवडा जर:
- तुम्हाला अकाउंट्स आवडत असेल
- CA/CMA करण्याचा विचार असेल
- Finance क्षेत्रात करिअर करायचे असेल
BBA निवडा जर:
- Business Management मध्ये रस असेल
- Leadership आणि Communication Skills सुधारायच्या असतील
- MBA करण्याचा विचार असेल
दोन्हीपैकी कोणताही पर्याय चुकीचा नाही; तुमची आवड आणि भविष्यातील उद्दिष्ट यावर निर्णय घ्या.
3. Maths नसल्यास कोणते कोर्स करता येतात?
१२वी कॉमर्समध्ये Maths नसले तरी अनेक चांगले करिअर पर्याय उपलब्ध आहेत.
विद्यार्थी खालील कोर्स करू शकतात:
पदवी अभ्यासक्रम:
- B.Com
- B.Com (Banking & Insurance)
- B.Com (Accounting & Finance)
- BBA
- Bachelor of Management Studies (BMS)
- Bachelor of Financial Markets (BFM)
- Bachelor of Commerce in Marketing
Professional Courses:
- CA
- CS
- CMA
- Digital Marketing Certification
- GST Practitioner Course
- Banking Courses
नवीन काळातील करिअर:
- Digital Marketing
- Social Media Management
- Content Marketing
- Business Analytics (काही कोर्समध्ये Maths आवश्यकता तपासा)
- E-commerce Management
Maths नसणे ही अडचण नाही; योग्य कौशल्य आणि योग्य कोर्स निवडणे महत्त्वाचे आहे.
4. सरकारी नोकरीसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
12th Commerce नंतर सरकारी क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत.
१२वी नंतर देता येणाऱ्या परीक्षा:
1. SSC CHSL
- LDC
- Junior Secretariat Assistant
- Data Entry Operator
2. Banking Sector
पदवी पूर्ण केल्यानंतर:
- IBPS Clerk
- SBI Clerk
- Bank PO
3. सरकारी विभागातील भरती
- Railway Recruitment
- Maharashtra Government Exams
- Staff Selection Commission Exams
4. UPSC आणि MPSC
पदवी पूर्ण केल्यानंतर:
- IAS
- IPS
- State Government Officer पदांसाठी प्रयत्न करता येतात.
5. Defence Services
- NDA (पात्रतेनुसार)
- इतर संरक्षण क्षेत्रातील संधी
सरकारी नोकरीसाठी अभ्यासासोबत:
- General Knowledge
- Current Affairs
- Reasoning
- English
- Marathi Language या विषयांवर लक्ष देणे आवश्यक आहे.
12th Commerce नंतर करिअरचे अनेक मार्ग खुले आहेत. CA, CS, B.Com, BBA, MBA, Banking आणि Government Jobs यापैकी योग्य पर्याय निवडताना विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, कौशल्य आणि भविष्यातील उद्दिष्ट लक्षात घ्यावे.
आम्हाला आशा आहे की 12th Commerce नंतर करिअर पर्यायांवरील हा ब्लॉग उपयुक्त ठरेल . जर तुम्ही वाणिज्य शाखेतील असाल आणि वाणिज्य शाखेतील उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांबद्दल तुम्ही द्विधा मनस्थितीत असाल, तर आम्हाला आशा आहे की हा ब्लॉग तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
