Posted in

EV Charging Station कसे सुरू करावे? Profitable Business सुरू करण्याची Complete Guide:2026

EV Charging Station
Image : AI Generated

आज पेट्रोल पंप दिसला की आपण फारसा विचार करत नाही. गाडी थांबवायची, पेट्रोल भरायचे आणि निघायचे.

पण रस्त्यावर इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती संख्या बघून एक गोष्ट समजत आहे EV Charging Station मध्ये व्यवसाय करायला आत्ताच संधी आहे.

यामुळेच काही लोक आता विचार करत आहेत, “आपल्याकडे highway जवळ जागा आहे, तर तिथे EV charging station सुरू करता येईल का?”

तर उत्तर आहे हो, नक्कीच.

पण इथे एक गैरसमज आधी दूर करूया.

EV charging station सुरू करण्यासाठी फक्त ₹10-15 लाखांचा charger आणून जागेवर ठेवली की business सुरू होत नाही.

जागा, वीजेचा load, transformer, electrical infrastructure, charger, software, payment system, maintenance आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे locationवर असलेली EV demand या सगळ्यांचा विचार करावा लागतो.

म्हणूनच हा business सुरू करण्याआधी संपूर्ण गणित समजून घेणे गरजेचे आहे.

EV Charging Station सुरू करण्यासाठी सर्वात आधी काय पाहावे?

समजा तुमच्याकडे शहराबाहेर 2,000-3,000 sq.ft. जागा आहे.

जागा मोठी आहे म्हणून charging station यशस्वी होईलच असे नाही.

त्यापेक्षा खालील प्रश्न महत्त्वाचे आहेत:

  • त्या रस्त्यावर दररोज किती वाहतूक आहे?
  • त्या route वर किती EV आहेत?
  • जवळ दुसरे charging station किती आहेत?
  • गाडी charge होईपर्यंत ग्राहक कुठे थांबणार?
  • जवळ हॉटेल, restaurant, café किंवा दुकान आहे का?
  • पुरेसा electricity load मिळू शकतो का?
  • highwayवरून station सहज दिसते का?
  • Google Maps आणि EV charging appsवर location दाखवता येईल का?

EV charging businessमध्ये location हा chargerपेक्षाही मोठा factor आहे.

उदाहरणार्थ, शहराच्या आत 60 kW charger लावला आणि दिवसभरात फक्त 3-4 गाड्या charge झाल्या तर महागडा charger असूनही business फारसा चालणार नाही.

त्याच वेळी highwayवर छोटा setup असला, पण नियमित taxi, truck , bus आणि private EV ग्राहक मिळत असतील तर त्याची कमाई चांगली होऊ शकते.


कोणत्या प्रकारचे EV Charging Station सुरू करता येते?

साधारणपणे दोन प्रकारांचा विचार केला जातो.

1. AC Charging

AC charger तुलनेने कमी खर्चाचा असतो. हा setup खालील ठिकाणी उपयोगी ठरतो:

  • Hotels
  • Offices
  • Malls
  • Apartments
  • Restaurants
  • Society parking
  • Long-stay parking

ग्राहक गाडी काही तास पार्क करणार असेल तर AC charging योग्य ठरू शकते.

2. DC Fast Charging

इथे charging वेग जास्त असतो आणि setupचा खर्चही वाढतो. हा पर्याय प्रामुख्याने:

  • Highways
  • Busy roads
  • Fuel stations
  • Commercial parking
  • Taxi/fleet hubs
  • Tourist routes यासाठी वापरू शकतो.

सरकारच्या EV charging guidelinesनुसार charging infrastructureसाठी वेगवेगळ्या power capacities आणि standardsचा विचार केला जातो.

त्यामुळे charger खरेदी करण्याआधी कोणत्या प्रकारच्या EV ग्राहकांना सेवा द्यायची आहे हे ठरवणे महत्त्वाचे आहे.


EV Charging Station सुरू करण्यासाठी किती investment लागते?

हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे.

एकच fixed amount मला देखील सांगता येणार नाही , कारण charger capacity, transformer, electricity connection, जमीन आणि civil work यावर खर्च मोठ्या प्रमाणात बदलतो.

तरी एक साधारण अंदाज असा पाहता येईल :

Setup अंदाजे Investment
छोटा AC charging setup ₹1–5 लाख+
Multiple AC chargers ₹5–12 लाख+
30–60 kW DC setup ₹12–30 लाख+
60 kW commercial fast-charging station ₹15–25 लाख+
मोठा highway charging hub ₹30 लाख ते ₹1 कोटी+

हे indicative figures आहेत. जमीन खरेदी किंवा मोठे rent/lease charges यात वेगळे असू शकतात.

उदाहरणार्थ, एका 60 kW DC stationमध्ये फक्त chargerची किंमत पाहून budget करू नका.

याशिवाय खर्च होऊ शकतो:

  • Transformer
  • Electrical panel
  • Cables
  • Metering
  • Earthing
  • Protection equipment
  • Civil foundation
  • Parking area
  • Canopy
  • CCTV
  • Internet
  • Signboard
  • Software/CMS
  • Installation
  • Maintenance

म्हणजेच “charger ची किंमत = charging station चा total खर्च” हे गणित चुकीचे आहे.


कोणत्या कंपन्या EV Charging Station setup करून देतात?

सगळे setup स्वतः करण्याची गरज नाही.

भारतामध्ये charging network आणि franchise/partner models देणाऱ्या काही कंपन्या आहेत.

Tata Power EZ Charge

Tata Powerकडे EV charging station franchise आणि turnkey setup model उपलब्ध आहे. Site evaluationपासून installation, branding आणि operational supportपर्यंत सेवा दिली जाते.

Tata Power EV Charging Station Franchise

Statiq

Statiqचा सध्याचा FOCO म्हणजे Franchise Owned, Company Operated model आहे.

यामध्ये infrastructureमध्ये गुंतवणूक franchise partner करतो आणि company setup, operations, billing, maintenance, customer support आणि monitoringसारख्या गोष्टी हाताळते.

Statiqच्या सध्याच्या माहितीनुसार DC fast-charging franchise investment साधारण ₹30 लाखांपासून सुरू होऊ शकते आणि setupच्या आकारानुसार ₹3 कोटींपेक्षा जास्तही जाऊ शकते.

Statiq EV Charging Station Franchise

ChargeZone

ChargeZone देखील franchise modelमध्ये काम करते. त्यांच्या सध्याच्या franchise informationमध्ये ₹20 लाख ते ₹10 कोटी अशी मोठी investment range दिली आहे. म्हणजे stationचा size आणि business modelनुसार खर्च खूप बदलतो.

ChargeZone Franchise

ZEON

ZEON franchise partnersसाठी setup, installation, operation, maintenance आणि monitoring support देत असल्याचे सांगते.

ZEON Franchise Partner Program

महत्त्वाचे: कंपनीची franchise fee, investment, revenue sharing आणि agreement terms वेळेनुसार बदलू शकतात. त्यामुळे पैसे देण्याआधी कंपनीकडून latest quotation आणि written agreement घ्या.


EV Charging Station सुरू करण्यासाठी license लागतो का?

भारत सरकारच्या Ministry of Powerच्या guidelinesनुसार EV charging station सुरू करणे ही de-licensed activity आहे. म्हणजे वीज विक्रीचा पारंपरिक licence घेऊनच charging station सुरू करावे लागते असे नाही.

पण याचा अर्थ असा नाही की कुठलीही परवानगी न घेता charger लावला आणि business सुरू केला.

तुमच्या locationनुसार खालील approvals लागू होऊ शकतात:

  • Electricity connection / load approval
  • Local municipal permissions
  • Fire safety requirements, लागू असल्यास
  • Commercial establishment-related registration
  • Land owner NOC, जागा भाड्याची असल्यास
  • Electrical safety compliance
  • Signage/advertising permission, लागू असल्यास
  • GST registration, व्यवसायाच्या परिस्थितीनुसार

सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक DISCOM कडून योग्य electricity connection आणि sanctioned load घेणे हे महत्वाचे आहे .


कोणती documents लागतात?

साधारणपणे खालील कागदपत्रांची गरज पडू शकते:

व्यक्ती/व्यवसायाची कागदपत्रे

  • PAN Card
  • Aadhaar/ओळखपत्र
  • Address proof
  • Bank account details
  • Business constitution documents
  • GST registration, लागू असल्यास

जागेची कागदपत्रे

जमीन स्वतःची असल्यास:

  • Land ownership documents
  • Property documents
  • Property tax-related documents, लागू असल्यास जागा rent/leaseवर असल्यास:
  • Registered lease/rent agreement
  • Land owner NOC
  • Electricity connectionसाठी आवश्यक documents

Electricity connectionसाठी

  • Application form
  • Load requirement
  • Property/occupancy documents
  • Identity/business documents
  • Electrical installation details
  • आवश्यक test/safety documents

प्रत्यक्ष कागदपत्रांची यादी राज्य, DISCOM, स्थानिक प्राधिकरण आणि stationच्या capacityनुसार बदलू शकते.

DigiLocker मध्ये तुम्ही तुमची महत्वाची कागदपत्र कसे ठेवू शकता हे माहिती करून घेण्यासाठी हे वाचा.


Electricity load किती लागतो?

समजा तुम्ही 60 kW DC charger लावणार आहात.

तर chargerच्या ratingइतकीच गोष्ट नाही. Electrical losses, other equipment आणि future expansionचा विचार करून power requirement ठरवावी लागते.

मोठ्या DC charging stationसाठी transformer किंवा load enhancementची गरज लागू शकते.

म्हणून charger खरेदी करण्यापूर्वी:

पहिले electrical feasibility → नंतर charger selection.

उलट केले तर नंतर मोठा खर्च होऊ शकतो.

Ministry of Powerच्या 2024 guidelinesमध्ये EV charging stationसाठी LT connectionसाठी 150 kWपर्यंतच्या loadचा पर्याय नमूद केला आहे.


EV Charging Stationमधून किती कमाई होते?

हा प्रश्न विचारताना “महिन्याला किती profit?” यापेक्षा दररोज किती electricity विकली जाईल? हा प्रश्न विचारला पाहिजे.

समजा तुमचा charging rate ₹15/kWh आहे.

एका दिवशी ग्राहकांनी मिळून 300 kWh charging केली तर:

300 × ₹15 = ₹4,500 daily gross charging revenue

30 दिवस:

₹4,500 × 30 = ₹1,35,000

हे gross revenue आहे.

यातून electricity cost, demand/fixed charges, rent, maintenance, software, staff, taxes, payment/network charges इत्यादी खर्च वजा करावे लागतील.

म्हणून ₹1.35 लाख revenue म्हणजे ₹1.35 लाख profit नाही.


मग खरा profit कशावर ठरतो?

मुख्यतः तीन गोष्टींवर:

  1. 1. Location
  2. 2. Charger utilisation
  3. 3. Electricity cost

एक 120 kW charger मोठा आहे म्हणून तो आपोआप जास्त पैसे कमावणार नाही.

जर तो दिवसभर idle असेल तर तो तुमच्यासाठी फक्त expensive equipment आहे.


Maintenance कोण करणार?

EV charger बसवल्यानंतर काम संपत नाही.

चार्जर चालू ठेवण्यासाठी नियमित:

  • Charger inspection
  • Cable/connector inspection
  • Electrical panel checking
  • Earthing checking
  • Software updates
  • Network monitoring
  • Cleaning
  • CCTV checking
  • Payment system checking
  • Emergency fault handling करावे लागते.

Franchise modelमध्ये काही कंपन्या हे काम स्वतः हाताळतात.

उदाहरणार्थ, Statiqच्या FOCO modelमध्ये company operations, billing, maintenance, uptime monitoring आणि customer support हाताळते.

Tata Power देखील franchise modelमध्ये installation आणि maintenance supportबाबत end-to-end approach सांगते.

पण agreement करताना एक गोष्ट नक्की तपासा:

AMC किती वर्षांची आहे आणि AMCमध्ये नेमके काय-काय समाविष्ट आहे?


EV Charging Stationमध्ये तुमची responsibility काय?

Company setup करून देत असली तरी business owner म्हणून काही जबाबदाऱ्या तुमच्याच राहतात.

उदा.:

  • जमीन उपलब्ध करून देणे
  • lease/rent खर्च
  • electricity bill
  • local permissions
  • security
  • cleanliness
  • customer सुविधा
  • stationची accessibility
  • local marketing
  • agreementनुसार maintenance खर्च

काही company-operated modelsमध्ये यातील बरीच कामे company घेऊ शकते.

म्हणून “franchise घेतली म्हणजे काहीच काम नाही” असे समजू नका. Agreement नीट वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


EV Charging Stationमधून फक्त chargingवरच पैसे मिळतात का?

नाही.

योग्य location असेल तर chargingसोबत इतर businessही जोडता येतात.

उदाहरणार्थ highwayवर station असेल तर:

  • Cafe
  • Tea/snacks counter
  • Restaurant
  • Convenience store
  • Car wash
  • Advertising
  • Paid parking

यातून additional revenue मिळू शकतो.

खरं तर EV chargingचा एक फायदा असा आहे की ग्राहक गाडी charge होईपर्यंत काही काळ तिथे थांबतो.

त्या 20-40 मिनिटांचा किंवा त्याहून जास्त वेळ businessमध्ये बदलता आला तर stationची economics सुधारू शकते.


EV Charging Station सुरू करण्याची practical process

जर आजपासून सुरुवात करायची असेल तर मी ही sequence वापरेन:

पहिला टप्पा — Location

जागेची निवड करा.

दुसरा टप्पा — EV Demand

त्या routeवर EV traffic आणि existing charging stations तपासा.

तिसरा टप्पा — Electricity Feasibility

DISCOMकडून required load मिळू शकतो का ते तपासा.

चौथा टप्पा — Business Model

स्वतः operate करणार की Tata Power, Statiq, ChargeZone, ZEONसारख्या companyसोबत partner करणार ते ठरवा.

पाचवा टप्पा — Charger Selection

AC, 30/60 kW DC किंवा त्यापेक्षा मोठा setup निवडा.

सहावा टप्पा — Quotation

किमान 2-3 vendors/companyकडून complete quotation घ्या.

फक्त chargerची किंमत विचारू नका.

“Turnkey projectची final cost किती?” असे विचारा.

सातवा टप्पा — Installation

Electrical infrastructure, civil work, charger installation आणि software integration पूर्ण करा.

आठवा टप्पा — Testing आणि Go-Live

Testing झाल्यानंतर station charging network/appवर live करा.


Government subsidy मिळते का?

होऊ शकते, पण इथेही काळजी घ्या.

केंद्र सरकारच्या PM E-DRIVE schemeमध्ये public EV charging infrastructureसाठी तरतूद आहे.

मात्र ही subsidy प्रत्येक private व्यक्तीने अर्ज केला आणि थेट पैसे मिळाले अशी साधी योजना नाही.

PM E-DRIVEच्या operational guidelinesमध्ये eligible entities, nodal agencies आणि location categoriesनुसार subsidy mechanism दिलेला आहे.

म्हणून “EV charging stationवर 80% किंवा 100% subsidy मिळते” असे कुठेही वाचले म्हणून लगेच investment करू नका.

तुमची जागा, entity, location category आणि schemeमध्ये eligibility तपासणे आवश्यक आहे.


EV Charging Station सुरू करणे फायदेशीर आहे का?

होऊ शकते. पण हा guaranteed-profit business नाही.

जर तुमच्याकडे:

  • स्वतःची चांगली location आहे,
  • पुरेसा electricity load मिळू शकतो,
  • जवळ EV traffic आहे,
  • highway/major road access आहे,
  • ग्राहकांना थांबण्यासाठी सुविधा आहेत  तर businessची शक्यता चांगली आहे.

पण फक्त “EVचे future आहे” म्हणून ₹20-30 लाख गुंतवणे योग्य नाही.

समजा तुमच्याकडे highwayजवळ जमीन आहे. आसपास आधीच चार charging stations आहेत आणि तिथे EV traffic कमी आहे.

अशा वेळी नवीन charger बसवण्यापेक्षा थोडे पुढे जाऊन fleet charging किंवा restaurant + charging model अधिक योग्य ठरू शकतो.

म्हणून या businessमध्ये एक वाक्य लक्षात ठेवा:

“Charger महत्त्वाचा आहे, पण योग्य जागा त्याहून महत्त्वाची आहे.”


practical सल्ला

जर तुमच्याकडे स्वतःची जागा असेल आणि EV charging station सुरू करण्याचा विचार असेल तर थेट charger खरेदी करू नका.

सुरुवातीला तीन कंपन्यांकडून site feasibility + complete project quotation मागवा.

त्यात हे सर्व वेगळे लिहून घ्या:

  • Charger cost
  • Transformer
  • Electricity connection
  • Civil work
  • Installation
  • Software
  • AMC
  • GST
  • Branding
  • Monthly charges
  • Revenue sharing
  • Expected utilisation
  • Warranty
  • Replacement cost

आणि सर्वात महत्त्वाचे—

“महिन्याला किती कमाई होईल?” यापेक्षा “दररोज किती kWh charging विकावी लागेल म्हणजे माझा खर्च निघेल?” हा प्रश्न विचारा.

कारण EV charging stationमध्ये नफा chargerच्या sizeमध्ये नसतो; तो charger किती वेळ वापरला जातो यात असतो.

आज एखाद्या गावाजवळ किंवा highwayवर EV charging station सुरू करणे ही कदाचित छोटी सुरुवात वाटेल.

पण पुढची काही वर्षे EV infrastructure वाढत गेली, तर आजची योग्य location उद्याच्या चांगल्या businessमध्ये बदलू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *