पगार किती आहे यापेक्षा, तो पगार आपण कसा वापरतो हे अधिक महत्त्वाचे असते.
घर, कुटुंब आणि भविष्यातील स्वप्नांचा विचार केला की आर्थिक नियोजनाची गरज अधिक जाणवते.
चला, आज आपण वैभवच्या एका महिन्याच्या ₹1 लाख salary चे Smart Budget Planning कसे करता येते ते समजून घेऊया.
महिन्याची 1 तारीख आली की वैभवच्या मोबाईलवर एक मेसेज यायचा
“Salary Credited: ₹1,00,000”
मेसेज पाहून वैभवला नेहमीच आनंद व्हायचा.
वैभव विवाहित आहे. त्याची पत्नी आणि दोन वर्षांचा छोटासा मुलगा, असे त्याचे तीन जणांचे कुटुंब. आयटी मध्ये नोकरी होती, पगारही मनासारखा होता. घर चालवण्यासाठी पैसे कमी पडत नव्हते.
पण एक गोष्ट मात्र त्याला सतत खटकत होती.
महिन्याच्या शेवटी बचत किती होते?
कधी ₹5,000, कधी ₹8,000 आणि कधी काहीच नाही.
वैभव स्वतःशीच म्हणायचा,
“माझा पगार ₹1 लाख आहे, मग महिन्याच्या शेवटी पैसे का उरत नाहीत?”
एके दिवशी त्याने ठरवले—
यावेळी फक्त पैसे कमवायचे नाहीत, तर त्यांचे नियोजनही करायचे.
वैभवने सर्वप्रथम एक साधा निर्णय घेतला
आतापर्यंत वैभवची बचतीकडे असा बघायचा
पगार आला → खर्च झाले → महिन्याच्या शेवटी जे उरले ते बचत.
पण त्याने ही पद्धत बदलली. त्याने स्वतःला एक विचार केला
“जर पगारातील प्रत्येक रुपयाला आधीच एक काम दिले, तर?”
मग त्याने कागद घेतला व त्याची कल्पना कागदावर लिहू काढली,
वैभवचा मासिक पगार – ₹1,00,000
आणि त्याने पगाराचे तीन मोठे भाग केले.

ही विभागणी वैभवच्या परिस्थितीचे उदाहरण आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्न आणि जबाबदाऱ्यांनुसार रक्कम बदलणे आवश्यक आहे.
पहिला भाग – ₹50,000 घर चालवण्यासाठी
वैभवला सर्वप्रथम माहीत होते की पगारातील काही पैसा घराच्या आवश्यक खर्चासाठी जाणारच आहे.
आवश्यक खर्च जसे की , घरभाडे किंवा EMI, किराणा, वीज, गॅस, प्रवास, मोबाईल/इंटरनेट आणि इतर घरगुती खर्च.
त्याने त्यासाठी अंदाजे ₹50,000 बाजूला ठेवले. आणि खालील प्रमाणे त्याची विभागणी केली.
| आवश्यक खर्च | अंदाजे रक्कम |
|---|---|
| घरभाडे / गृहकर्ज EMI | ₹20,000 |
| किराणा व घरखर्च | ₹10,000 |
| वीज, गॅस, मोबाईल, इंटरनेट | ₹4,000 |
| पेट्रोल / प्रवास | ₹5,000 |
| विमा व इतर आवश्यक खर्च | ₹5,000 |
| इतर घरगुती खर्च | ₹6,000 |
| एकूण | ₹50,000 |
टीप : एखाद्याचे घरभाडे जास्त असू शकते. कोणाची EMI मोठी असू शकते. गावात राहणाऱ्या व्यक्तीचा खर्च वेगळा असू शकतो.
म्हणून दुसऱ्याचे budget जसेच्या तसे copy करण्यापेक्षा स्वतःच्या खर्चाची खरी नोंद करणे महत्त्वाचे आहे.
दुसरा भाग – ₹20,000 कुटुंबासाठी आणि Lifestyle साठी
जीवन म्हणजे फक्त काम , EMI, किराणा आणि बचत नाही.
पत्नी आणि मुलासोबत कधी बाहेर जेवायला जाणे, मुलासाठी एखादे toy घेणे, छोटासा weekend trip, स्वतःसाठी एखादी वस्तू घेणे—हेही जीवनाचाच भाग आहे.
त्यामुळे त्याने ₹20,000 Lifestyle आणि वैयक्तिक/कुटुंबीय खर्चासाठी ठेवलेच पाहिजे.
वैयक्तिक/कुटुंबीय खर्चामध्ये:
- कुटुंबासोबत बाहेर जाणे
- मनोरंजन – Movie , नाटक, Concert.
- कपडे
- छोट्या ट्रिप्स
- वैयक्तिक खर्च
- मुलासाठी छोटे खर्च – toys , कपडे.
- इतर इच्छा ………. यांचा समावेश होऊ शकतो.
“हा खर्च करायचा आहे, पण budget च्या बाहेर नाही.”
म्हणजे ₹20,000 संपले तर त्या महिन्यात आणखी ₹10,000 खर्च करण्यासाठी credit card काढायचा नाही.
Personal finance, saving, financial awareness आणि responsible financial behaviour यासाठी अधिकृत RBI source ला भेट द्या.
आणि मग वैभवला त्याच्या मुलाची आठवण झाली…
वैभवचा दोन वर्षांचा मुलगा अजून खूप लहान होता. आज त्याचा खर्च फार मोठा वाटत नव्हता.
पण वैभवला माहिती होते की पुढील काही वर्षांत खर्च वाढणार आहे.
शिक्षण , वैद्यकीय खर्च , त्याच्या इच्छा अपेक्षा आणि भविष्यातील higher education…
त्यामुळे त्याने ठरवले “मुलगा लहान आहे म्हणून planning उशिरा करायची नाही.”
यामुळे त्याच्या बजेटमधील पुढचा भाग अधिक महत्त्वाचा झाला.
तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग – ₹30,000 भविष्याकरिता
आता वैभवच्या हातात ₹30,000 उरले. पूर्वी हे पैसे महिन्याच्या शेवटी उरले तर बचत होत असे.
यावेळी मात्र त्याने ठरवले . ₹30,000 आधीच वेगळे करायचे.
त्याने या पैशांचे दोन भाग केले.
₹10,000 – अल्पकालीन बचत
वैभवने ही रक्कम Emergency Fund आणि जवळच्या भविष्यातील गरजांसाठी ठेवायला सुरुवात केली.
कारण आयुष्यात अचानक खर्च कधी येईल सांगता येत नाही.
- गाडी खराब होऊ शकते.
- घरात अचानक मोठा खर्च येऊ शकतो.
- नोकरीमध्ये काही अडचण येऊ शकते.
अशा वेळी credit card किंवा कर्जावर अवलंबून राहण्यापेक्षा काही रक्कम सहज उपलब्ध असणे उपयोगी ठरते.
वैभवचे लक्ष्य होते—
हळूहळू काही महिन्यांच्या आवश्यक खर्चाएवढा Emergency Fund तयार करणे.
हे वाचा : Expense Tracker : आपले आर्थिक नियोजन आणि खर्च ट्रॅक करण्यासाठी Best Guide
उरलेले ₹20,000 – भविष्यासाठी
आता राहिले ₹20,000.
हा पैसा वैभवने आपल्या भविष्यातील मोठ्या उद्दिष्टांसाठी ठेवला.
त्याच्या मनात तीन मोठे प्रश्न होते.
मुलाचे शिक्षण
आज मुलगा फक्त दोन वर्षांचा आहे. पण 10-15 वर्षांनी शिक्षणाचा खर्च आजपेक्षा वेगळा असू शकतो.
म्हणून वैभवला आतापासूनच त्यासाठी स्वतंत्र planning करायची होती.
स्वतःचे Retirement
“Retirement अजून खूप लांब आहे” असे म्हणून तो हा विषय टाळणार नव्हता.
लवकर सुरुवात केल्याने दीर्घकाळ बचत करण्याची संधी मिळते.
भविष्यातील मोठी उद्दिष्टे
घर, मोठी खरेदी, व्यवसाय , परदेश सहल किंवा इतर कोणतेही मोठे आर्थिक लक्ष्य असेल तर त्यासाठी स्वतंत्र निधीचे Smart Budget Planning करणे सोपे जाते.
गुंतवणुकीचा पर्याय निवडताना मात्र वैभवने फक्त “कोणता पर्याय जास्त return देतो?” एवढेच पाहिले नाही.
त्याने उद्दिष्ट, कालावधी आणि जोखीम यांचाही विचार केला.
जरा नियोजन , शिस्त आणि संयम यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक स्थिरता नक्की येते.
पगार वाढला तर काय?
काही महिन्यांनी वैभवचा पगार वाढून ₹1,20,000 झाला.
पूर्वी असता तर कदाचित त्याने लगेच नवीन फोन, नवीन gadgets किंवा महागड्या outingsचा विचार केला असता.
पण आता त्याची विचार करण्याची पद्धत बदलली होती.
त्याने स्वतःला विचारले—
“माझे उत्पन्न वाढले आहे. पण माझे सर्व खर्च त्याच प्रमाणात वाढवण्याची गरज आहे का?”
त्याने ठरवले की वाढलेल्या उत्पन्नातील काही भाग भविष्यातील बचत आणि आर्थिक उद्दिष्टांकडे वळवायचा.
यालाच अनेकदा Lifestyle Inflation टाळणे असे म्हटले जाते.
हे वाचा : Mutual Fund SIP: Best Guide मराठीत | SIP कसे सुरू करावे?
पण तुमचा पगार ₹1 लाख नसेल तर?
इथेच वैभवची गोष्ट तुमच्यासाठी उपयोगी ठरते. तुमचा पगार ₹25,000 असो, ₹40,000 असो किंवा ₹70,000—
₹1 लाखाच्या आकड्याची नक्कल करण्याची गरज नाही.
वैभवकडून फक्त एक नियोजन पद्धत शिका.
पगार मिळाल्यावर स्वतःला हे चार प्रश्न विचारा:
1. माझा आवश्यक घरखर्च किती आहे?
2. मी इच्छांवर किती खर्च करतो?
3. माझ्याकडे Emergency Fund आहे का?
4. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी मी दर महिन्याला किती बाजूला ठेवतो?
या चार प्रश्नांची उत्तरे मिळाली की तुमचे Smart Budget Planning हळूहळू स्पष्ट होऊ लागेल.
वैभवने एक छोटी सवय बदलली
पूर्वी वैभव “महिन्याच्या शेवटी किती उरले?” हे पाहायचा.
आता तो “महिन्याच्या सुरुवातीला किती बाजूला ठेवले?” हे पाहू लागला.
ही छोटी मानसिकता बदलली आणि त्याचे आर्थिक नियोजन अधिक शिस्तबद्ध झाले.
त्याला समजले—
बचत म्हणजे महिन्याच्या शेवटी उरलेले पैसे नाहीत; बचत ही महिन्याच्या सुरुवातीलाच केलेली एक जाणीवपूर्वक निवड आहे.
तुमचाही पगार वैभवसारखा नियोजित करा
तुमचा पगार किती आहे हे महत्त्वाचे आहेच.
पण त्याहून महत्त्वाचे आहे की तुमच्या पगारातील प्रत्येक रुपयाचे काम काय आहे?
घर चालवणे ते ही budge मध्ये हे एक काम नसून कला आहे.
- कुटुंबासाठी आनंद निर्माण करणे.
- अचानक येणाऱ्या अडचणींसाठी तयार राहणे.
- आणि आपल्या मुलांच्या आणि स्वतःच्या भविष्यासाठी तयारी करणे .
वैभवने हे सगळे एका दिवसात केले नाही. त्याने फक्त पगार मिळाल्यानंतर थांबून विचार करायला सुरुवात केली. आणि कदाचित तुमच्यासाठीही Smart Budget Planning ची सुरुवात अशीच असू शकते.
Smart Budget Planning बद्दल माझा विचार
पगाराच्या दिवशी बँकेचा मेसेज पाहून आनंद होतो.
पण महिन्याच्या शेवटी आपल्या पैशांनी आपल्यासाठी काय केले, हे समजले तर त्या आनंदाला वेगळीच किंमत असते.
₹1 लाख पगार असो किंवा ₹30 हजार—पैशांचे योग्य नियोजन ही श्रीमंत होण्यासाठीची गोष्ट नाही; ती आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यासाठीची सवय आहे.
वैभवने आपल्या पगाराकडे फक्त “खर्च करण्यासाठी आलेले ₹1 लाख” म्हणून पाहणे सोडले.
त्याने त्याकडे पाहिले की “माझ्या कुटुंबाच्या आजच्या गरजा आणि उद्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मिळालेली ₹1 लाखांची संधी.”
आणि इथूनच त्याच्या आर्थिक नियोजनाची खरी सुरुवात झाली.
टीप: वरील ₹1 लाखाचे विभाजन हे वैभवच्या काल्पनिक उदाहरणासाठी आहे. प्रत्येक कुटुंबाचा खर्च, कर्ज, उत्पन्न आणि आर्थिक उद्दिष्टे वेगळी असतात. त्यामुळे स्वतःचे Smart Budget Planning तयार करताना आपल्या वास्तविक परिस्थितीनुसार रक्कम ठरवा.
